प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन अल्पवयीनांसह दोन जण ताब्यात

दोन अल्पवयीन मुलांची बाल सुधार गृहात रवानगी

0

जळगाव : दुचाकीला कट लागल्याच्या संशयावरुनजुनेद अक्खतर गंभीर खान याच्यावर दगड व धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दि. ११ मे रोजी पुष्पा पेट्रोलपंपाजवळ घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह दिनेश गोपाल चौधरी आणि फरार असलेल्या तुषार उर्फ धडकन प्रमोद कोळी (वय २०, – रा. रामेश्वर कॉलनी) याच्यासह एक अल्पवयीन मुलास कुसुंबा येथून ताब्यात घेतले असून यातील संशयितांची संख्या चार झाली आहे.

शहरातील उस्मानिया पार्कमधील इकरामोद्दीन कमरोद्दीन शेख, जुनेद अक्खतर गंभीर खान व मनियार सलमानखान अब्दुलगफार खान हे फातेमा नगरातून दुचाकीवरुन येत होते. यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारांना आपल्या दुचाकीला कट मारल्याच्या संशयावरुन त्यांनी अजून काही जणांना बोलावून घेत दुचाकीस्वारांना मारहाण करण्यास सरुवात केली यावेळी दुचाकीस्वार तिघे पळून गेल्यानंतर संशयित टोळक्याने जुनेद खान याच्या मागे धावत जावून त्याला मारहाण केली. तसेच त्यांनी दगडांसह धारदार शस्त्राने जूनेवर प्राणघातक हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले होते. यामुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी मनियार खान याने दिलेल्या तक्रारीवरुन खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरम्यान जुनेद अखतर याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यानंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुलढाणा येथून अटक

संशयित हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा येथे पळून गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पथक त्यांनी रवाना केले. या पथकाने नांदूरा येथून दिनेश गोपाल चौधरी (वय १९, रा. अशोक किराणा) याच्यासह एक अल्पवयी मुलाला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने पोलीसकोठडी सुनावली आहे. तसेच मंगळवारी कुसुंबा येथून तुषार उर्फ धडकन प्रमोद कोळी याच्यासह एक अल्पवयीन मुलाच्या मुसक्या आवळल्या.

दोघांची बालसुधारगृहात रवानगी

अटकेत असलेल्या चौघांपैकी दोन जण अल्पवयीन मुले आहेत. त्यांना न्यायाधीश जी. आर. कोलते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या दोघ अल्पवयीन मुलांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, किरण पाटील, पोना किशोर पाटील, सचिन पाटील, पोकॉ चंद्रकांत पाटील, छगन तायडे, किरण पाटील यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.