शेतातील वाहिवाट रस्त्यावरून एकावर जीवघेणा हल्ला

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात शेतातील वहिवाटीचा रस्त्याच्या वादातून एकाला खड्ड्यात ढकलून देत अंगावर माती लोटून जिवंत खड्ड्यात दाबून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवार दि. १४ मार्च रोजी रात्री उशिरा ५ जणांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मानसिंग प्रतापसिंग शिख (वय – ४०) रा. गिरणा गॅस गोडाऊन, जवळ पाचोरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती व वकीला व्यवसायक करून आपला उदरनिर्वाह करत असतात. त्याचे पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात शेत आहे. या शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्त्याचा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. दरम्यान १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शेतातील वहिवाटाचे रस्त्यात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम सुरू केल्याचे मानसिंग यांना दिसून आले. याबाबत चंद्रकांत श्रीराम शर्मा आणि अरुण चंद्रकांत शर्मा यांना विरोध केला असता त्यांनी मानसिंग याला खड्ड्यात ढकलून दिले व जेसीबीच्या मदतीने अंगावर माती टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये जिवंतपणे खड्ड्यात दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार घडत असताना मानसिंग याचे भाऊ यांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. त्यानंतर मंगेश सुखदेव चंदनशिव, देविदास धनराज पाटील आणि जेसीबीचे चालक दीपक धनगर यांनी मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर मानसिंग प्रतापसिंग शिख यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार दि. १४ मार्च रोजी रात्री ११ वाजता ५ जणांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.