पतीकडून धारदार सुरीच्या हल्ल्यात पत्नी जखमी

रामेश्वर कॉलनीतील घटना

0

पतीकडून धारदार सुरीच्या हल्ल्यात पत्नी जखमी
रामेश्वर कॉलनीतील घटना

जळगाव : घरात मुलांसह उपस्थित असलेल्या पत्नीवर पतीने धारदार सुरीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील रामेश्वर कॉलनीत घडली. दि. २१ एप्रिल रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपाली नरेंद्र काकडे (वय ३४, रा. रामेश्वर कॉलनी, आदित्य हॉटेलजवळ) या महिला आपल्या मुलांसह घरी होत्या. दरम्यान, त्यांचे पती नरेंद्र काकडे यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी न देता घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यांनी घराची बंद असलेली कडी उघडल्याने रुपाली यांनी याबाबत जाब विचारला.

या वादातून संतप्त झालेल्या नरेंद्र काकडे यांनी त्यांच्या पत्नीवर धारदार सुरीने हल्ला करत गळा आणि खांद्यावर वार केले. या हल्ल्यात रुपाली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी नरेंद्र काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.