Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सावधान.. हेअर ट्रान्सप्लांटमुळे इंजिनिअरचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    सावधान.. हेअर ट्रान्सप्लांटमुळे इंजिनिअरचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कानपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आजकाल अनेक जण हेअर ट्रान्सप्लांटच्या नादात पडत आहे. हेच हेअर ट्रान्सप्लांटमुळे एका तरुणाचा दुःखद मृत्यू झाला आहे.  उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. हेअर ट्रान्सप्लांट करताना इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला. पंकी पॉवर हाऊसमध्ये इंजिनिअर म्हणून काम करणारा तरुण हेअर ट्रान्सप्लांटसाठी एका खासगी क्लिनिकमध्ये गेला होता. हेअर ट्रान्सप्लांट करताना डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले. त्यानंतर इंजिनिअरचा चेहरा सुजला. त्याचे डोळे बाहेर आले.

    यानंतर त्याची प्रकृती खूरच बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर डॉक्टर क्लिनिक बंद करून पळून गेली. महत्वाचे म्हणजे, या धक्कादायक घटनेची दखल पोलिसांनी तात्काळ घेतली नाही. ५४ दिवसांनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

    पंकी येथील ऑफिसर्स कॉलनी येथे राहणारे ३७ वर्षीय विनीत दुबे हे पॉवर प्लांटमध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून काम करत होते. ते मूळचे गोरखपूरचे होते. विनीत दुबे यांना पत्नी जया आणि दोन मुले आहेत. होळीच्या दिवशी पत्नी जया मुलांसह गोंडा येथील माहेरी घरी गेली होती. विनीतला बायकोला सरप्राईज द्यायचे होते. त्यामुळे १३ मार्च रोजी विनीत हेअर ट्रान्सप्लांटसाठी एम्पायर वाराही क्लिनिकच्या डॉ. अनुष्का तिवारी यांच्याकडे गेले. याठिकाणी हेअर ट्रान्सप्लांटदरम्यान विनीतची प्रकृती बिघडली.

    विनीत दुबे यांची प्रकृती बिघडली तेव्हा डॉक्टरांनी त्याला शारदानगर येथील अनुराग रुग्णालयात दाखल केले आणि ती घटनास्थळावरून गायब झाली. विनीत दुबेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ‘डॉ. अनुष्काने मला फोन करून सांगितले की विनीतच्या चेहऱ्यावर सूज आली आहे. म्हणूनच आम्ही त्याला रुग्णालयात दाखल करणार आहोत. सध्या त्याला वेदना कमी करणारे इंजेक्शन देण्यात आले आहे. यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची गंभीर प्रकृती पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रिजन्सी नर्सिंग होममध्ये दाखल केले. जिथे उपचारादरम्यान १४ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला.

    विनीत दुबे यांच्या मृत्यूनंतर हेअर ट्रान्सप्लांटचे क्लिनिक आणि फोन बंद करून डॉ. अनुष्का तिवारी पळून गेली. विनीत दुब यांची पत्नी म्हणाल्या की, ‘सर्व ऑडिओ-व्हिडिओ आणि इतर पुराव्यांसह सीएम पोर्टलवर आरोपी डॉक्टरविरुद्ध तक्रारही केली. पुराव्यांसह तक्रारीनंतर रावतपूर पोलिस ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवण्यात आली.’ डॉ. अनुष्कावर रुग्णालयांचा पत्ता न देता उपचार केल्याचा आणि कुटुंबीयांना माहिती न देता रुग्णालयातून पळून गेल्याचा आरोप आहे. सध्या पोलिस डॉक्टराचा शोध घेत आहे.

     

    Hair Transplant
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif