Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»दहशतवाद्यांच्या हत्यांमुळे पाकिस्तान घाबरले
    ब्रेकिंग

    दहशतवाद्यांच्या हत्यांमुळे पाकिस्तान घाबरले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 17, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय हादरली आहे. शनिवारी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा जवळचा सहकारी नदीम ऊर्फ अबू कताल मारला गेला. तो हाफिज सईद याचा भाचाही आहे. त्याच्या हत्येबरोबर हाफिज सईदसुद्धा जखमी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु हाफिज सईद सुरक्षित आहे. त्याला असलेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे. सईद याच्या घराचे रुपातंर सबजेलमध्ये करण्यात आले आहे. अशी माहिती पाकिस्तानी पत्रकार अजाज सईद यांनी दिली.

    हाफिज सईद याच्यावर अनेकवेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. परंतु तो प्रत्येक वेळी वाचला आहे. त्याला असलेला धोका लक्षात घेऊन त्याच्या घराजवळ सुरक्षा आणखी वाढवली आहे. घराचे रुपातंर एका सबजेलमध्ये करण्यात आले आहे. हाफिज सईद टेरर फंडिगच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. परंतु प्रत्यक्षात तो लाहोरमध्ये नजरकैदेत आहे. त्या ठिकाणी त्याला मर्यादीत स्वातंत्र दिले आहे.

    हाफिज सईद हा मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. मुंबई हल्ल्यात 160 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 2006 मध्ये झालेल्या मुंबईतील लोकल बॉम्बस्फोटात सुद्धा हाफिज सईदचा हात असल्याचा भारताचा आरोप आहे. तसेच 2001 साली भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात सुद्धा सईदचे नाव समोर आले होते. तो संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आली आहे.

    अबू कताल याची शनिवारी हत्या झाल्यानंतर पाकिस्तान हादरला आहे. अबू कताल हा हाफिज सईद याचा नातेवाईक आहे तसेच तो जमात उद-दावाचा टॉप कमांडर होता. त्याने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. त्यामुळे हाफिज सईद याने त्याला लश्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवले होते.

     

    Hafiz Saeed
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

    August 1, 2026

    मुक्ताईनगरात ट्रकमधून 340 लिटर डिझेल चोरी

    July 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif