भडगाव शहरात श्री.सदस्यांनी राबविले स्वच्छता अभियान

0

भडगाव शहरात श्री.सदस्यांनी राबविले स्वच्छता अभियान

भडगाव -प्रतिनिधी

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या जन्मशताब्दि निमित्त भडगाव शहरात ठिकठिकाणी १४ भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

दि.२ रोजी सकाळी ९ वाजेपासुन भडगाव बसस्थानकापासुन स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली.यावेळी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक निरीक्षक यांच्या सह जवळपास ४०० श्रीसदस्यांचा या स्वच्छता अभियानात सहभाग होता.

शहरातील बसस्थानक, तहसिल कार्यालय परिसर,बढेसर काॅम्पलेक्स, पाचोरा रोड, गणपती मंदिर, पोलीस लाईन, दत्त मंदिर, नगर परीषद, हनुमान मंदिर, मेनरोड, भवानीबाग, गिरणा काॅलनी, पेठ चौफुली, पेठ मारोती मंदिर, पेठ जिल्हा परीषद शाळा आदि १४ वेगवेगळया भागात ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यात सुमारे चाडेचारशे (४५०) टन कचरा संकलीत करण्यात आला.

सर्व श्रीसदस्यांना विशेष परीश्रम घेतले. ही स्वच्छता मोहिम भडगाव, पाचोरा, पारोळा, चाळीसगाव आदि ४ ठिकाणी राबविण्यात आली आहे. अशी माहिती दैनिक लोकशाहीला देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.