भुसावळमध्ये २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळात तीन कंटेनरमध्ये भरलेला तब्बल २ कोटी २७ लाख रूपयांचा गुटखा डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अनेक राज्यांमधून भुसावळमार्गे गुटख्याची वाहतूक केली जाते. आधीही अशा प्रकारे गुटख्याची वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. गुटख्याच्या वाहतुकीबाबत भुसावळ येथील डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सहकार्‍यांचे पथक तयार करून भुसावळ-साकेगाव दरम्यान पाहणी केली. या वेळी साकेगावजवळील पेट्रोल पंपावर तीन कंटेनर उभे असलेले दिसले. या वेळी पोलिस ताफा कंटेनरकडे वळताच कंटेनरचालक पसार झाले. मात्र, एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले. या तिन्ही कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे दिसून आले.

तिन्ही कंटेनर डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात पंचनामा करून जमा केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.