Sunday, November 27, 2022

शाळेत अंदाधुंद गोळीबार; सहा ठार, 20 जण जखमी

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मध्य रशियातील इझेव्हस्क येथील एका शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था टास (TASS) ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या गोळीबारात 7 मुलांसह मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमी व मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तर हल्लेखोराने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शाळेमध्ये सुरक्षा आणि मदत बचाव पथके पोहोचली आहेत.

एएफपी न्यूज एजन्सीने अंतर्गत मंत्रालयाच्या हवाल्याने मध्य रशियामधील शाळेत गोळीबार झाल्याचे वृत्त दिले आहे. रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. ती शाळा रिकामी करण्यात आली असून आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचा आवाज ऐकल्याने घाबरलेले विद्यार्थी आणि शाळेतील इतर कर्मचारी शिक्षक घटनेच्या वेळी एका छोट्या खोलीत लपून बसले होते. या घटनेचा आधिक तपास सुरू आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या