राज ठाकरे भाजपचे एजंट; गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेमुळे चांगलेच वातावरण तापले आहे. यामुळे राज ठाकरेंवर प्रचंड टीका होतांना दिसताय. त्यात आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर कठोर शब्दात हल्ला केला आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा तीन वेळा झेंडा बदलून व अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका बदलत असतात त्यांना यश मिळत नाही असे असताना हा देखील त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलणे सुरु केली आहे. राज ठाकरे हे भाजपचे एजंट म्हणून काम करीत आहेत.

तसेच औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची रेकॉर्डब्रेक सभा होणार आहे. या सभेची मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये व महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड उत्सुकता लागली आहे. या पाश्वभूमीवर पाटील म्हणले की, राज ठाकरे सभा घेत असतात त्यांना त्याचा छंद आहे. तो त्यांनी जोपासावा, राज ठाकरे यांच्या पक्षाला यश मिळावे म्हणून ते सातत्याने प्रयत्न करीत आहे त्या पार्श्वभूमीवर काहीतरी बस्तान व्हावे म्हणून यासाठी त्याची धडपड सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here