गुलाबराव पाटील महाविद्यालयात सायबर क्राईमवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांच्यातर्फे सायबर क्राईम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ mkcl जळगावचे जिल्हा समन्वयक उमाकांत बडगुजर, राजेंद्र चव्हाण, लक्ष्मी कॉम्प्युटर प्रो. मोरे हे मार्गदर्शक लाभले. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. कंखरे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उमाकांत बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम म्हणजे काय ते कशाप्रकारे घडते, तसेच मोबाईलचा योग्य वापर, त्याबाबतची सुरक्षितता, इंटरनेट व मोबाईलमुळे घडणारे गुन्हे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल वापराबद्दल सूचना करून त्याचे दुष्परिणाम ही समजून सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांनी मोबाईल व इंटरनेट वापरताना काय काळजी घ्यावी हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्रा. भूषण पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयातील आय टी. विभागाचे प्रमुख मोनिका पाटील यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्रा. जयश्री सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.