गुलाबराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कुस्ती खेळाविषयीं मार्गदर्शन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

उत्तर महाराष्ट्र कुस्ती महासंघाचे सरचिटणीस पैलवान मेजर धर्मराज पाटील (माजी सैनिक) यांचे पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थांसाठी कुस्ती संबंधी विशेष व्याख्यान संपन्न.

धर्मराज पाटील यावेळी म्हणाले की, कुस्ती हा देशाच्या अभिमानाचा व गौरवाचा खेळ आहे. कुस्ती हा वैयक्तिक खेळ असून स्वबळावर यश किंवा अपयश यात अवलंबून असते. या क्षेत्रात विविध कुस्तीपटू कसे घडले याची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कुस्ती या खेळाविषयी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन केले.

त्यांनी विविध खेळ, त्याचे महत्त्व तसेच, सैन्य दलात तरुणांना असलेल्या विविध संधी, याविषयी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. दीपक पवार यांनी महाविद्यालयीन शिक्षण व क्रीडा कौशल्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य योगेश करंदीकर होते. तर संस्थेचे प्रताप पाटील, विक्रम पाटील यांचीही विशेष उपस्थिती लाभली. प्रा. राकेश ठाकरे आणि प्रा. भूषण पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काम पहिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.