जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात हा पाठिंबा देण्यात आला आहे.
महासंघाचा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सामाजिक एकता आणि विकासाचे उद्दिष्ट ठेवून, गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. महासंघाने आपल्या सदस्यांना, मतदारसंघातील सर्व मराठा बांधवांना, तसेच समाजातील इतर घटकांनाही गुलाबराव पाटील यांच्या बाजूने समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.गुलाबराव पाटील हे आपल्या भागातील जनतेच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे खानदेश मुलुख मैदान तोफ माहितीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बीबी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील व सदस्य उपस्थित होते. युवा नेतृत्व तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून ऋण व्यक्त केले आहे.
उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी .बी. भोसले, जिल्हाउपाध्यक्ष विश्वास पाटील, जितेंद्र पाटील, किशोर राघो पाटील, दोनगाव सरपंच भागवत पाटील, नाटेश्र्वर पवार, अमोल पाटील, यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.