नवरात्रीत गर्भाशय मुखाच्या कर्करोगा संदर्भात जनजागृती
किशोरवयीन मुलींच्या माध्यमातून छत्री नृत्याचे आयोजन
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
गोरान ग्रॉसस्कॉफ फॅमिली क्लीनिक, कोथरूड, पुणे यांनी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून पुणे येथील वेगवेगळ्या विभागांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगा संदर्भात सर्वसामान्य महिलांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या हेतूने किशोरवयीन मुलींच्या माध्यमातून छत्री नृत्याचे आयोजन केले. या माध्यमातून गर्भाशयाच्या कर्करोगाची आणि त्यावरील एचपीव्ही लसीकरणाची माहिती देण्यात आली.
पुण्याच्या वारजे, गोकुळनगर, शिवणे, जयभवानी नगर, सुतारदरा, केळेवाडी, सुतारवाडी या भागांमध्ये नृत्याचे आयोजन करण्यात आले. गर्भाशय मुखाचा कर्करोगावर प्रतिबंध करण्यासाठी ३० वर्षांवरील महिलांची वेळोवेळी तपासणी आणि ९ ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण याचे महत्व सदर कार्यक्रमातून देण्यात आले. तसेच संस्थेच्या विविध सेवा, सुविधांचे माहिती पत्रक कार्यक्रमासाठी जमलेल्या उपस्थित महिलांना देण्यात आले.

गोरान ग्रॉसस्कॉफ फॅमिली क्लिनिक कोथरूड, हे फॅमिली प्लांनिंग असोसिएशन ऑफ इंडिया च्या अंतर्गत पुण्यातील विविध वस्त्या आणि, मावळ व मुळशी येथील काही गावांमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्य व हक्क यासाठी काम करणारी संस्था आहे. संस्थेमार्फत फॅमिली प्लॅनींग ऑपरेशन, सुरक्षित गर्भपात, एचपीव्ही लसीकरण, कुटुंबनियोजन पद्धती सल्ला व मार्गदर्शन, गरोदर महिलांची तपासणी, इतर महिला आरोग्याच्या सुविधा माफक दरात दिल्या जातात.
छत्री नृत्याच्या माध्यमातून गर्भाशय मुखमुखाच्या कर्करोगा साठी जाणीव जागृती करण्याचा संस्थेचा अनोखा प्रयत्न होता. ११ वेगवेगळ्या नवरात्र मंडळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.