Sunday, May 29, 2022

गुढीपाडव्याला कडुनिंब का खातात ? जाणून घ्या शास्त्रीय कारण

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

चैत्र महिन्यामध्ये प्रचंड उन्हाचा चटका असतो. तसेच हवामानात अनेक बदल देखील होत असतात. या बदलत्या हवामानात अनेक व्याधी डोकं वर काढतात. या व्याधी जडू नये म्हणून आयुर्वेदामध्ये कडुनिंबाचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. म्हणून आपल्या आहारात कडुनिंबाचा समावेश करणं गरजेचं असतं.

- Advertisement -

औषधी वनस्पतीमध्ये कडुलिंबाचे अत्यंत महत्व आहे. कडुलिंब चवीला कडू असले तरी ते बहुगुणी आहे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाचा उपचार केल्यास रक्त, पचन आणि त्वचेशी निगडीत कित्येक असाध्य रोग दूर होऊ शकतात. शिवाय साधा ताप, खाज-खरुज, मच्छर चावणे, इन्फेक्शन आणि जुन्या जखमा भरणे यांसारख्या गोष्टींत सुद्धा कडुलिंब रामबाण ठरते. तसेच गोवर, कांजिण्या झाल्यावर कडुनिंबाच्या पाण्यानं आंघोळ करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्वचाविकारामध्ये कडुनिंबाची भूमिकाच बहुमोल आहे. कडुनिंबाच्या सेवनानं रक्त शुध्दीकरण होतं.

कडुलिंबाचे पौष्टिक तत्व आणि गुणधर्म

कडुलिंबामध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात. यात कैल्शियम, मॅग्निशियम, पोटेशियम, सोडियम, विटामिन ए, विटामिन सी, बीटा कैरोटीन, लाइकोपीन , प्रोटीन, आयरन, गंधक असतात. शतकानुशतके याचा उपयोग होत आहे. वास्तविक त्यात अँटी बॅक्टेरिया, अँटी फंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीवायरल असे महत्वाचे गुणधर्म आहेत.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

कडुनिंब खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. होय, जर दररोज काही कडुनिंबाची पाने रिकाम्या पोटावर चघळली गेली तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण त्यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

मुरुमांच्या समस्येपासून मुक्ती

कडुलिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होते. कडुलिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे वृद्धत्वाच्या समस्येचे निदान करण्यात देखील मदत करते, यामुळे त्वचा निस्तेज आणि टवटवीत दिसतेे. कडुलिंबाचे तेल किंवा पेस्ट चेहऱ्यावर नियमितपणे लावल्याने त्वचेवरील वयाचा परिणाम दिसत नाही.

पचनक्रिया सुरळीत होते

कडुनिंबाची पाने पोटातील पाचन क्रिया बरे करते. हे पोटात अल्सर, ज्वलन, गॅस सारख्या समस्या दूर करते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करते. कडुनिंब पोटातून विषारी टॉक्सीक पदार्थ काढून पोट पूर्णपणे स्वच्छ करते.

त्वचेच्या ससमस्या दूर होतात

कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल यांसारखे अनेक गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचा संसर्ग दूर करण्याचे कार्य करते. त्वचेवरील कोणत्याही बॅक्टेरियांचा संसर्ग दूर करण्यासाठी कडुलिंबाचे तेल वरदान असल्याचे मानले जाते. ज्या ठिकाणी जखम झाली आहे तेथे कापसाच्या मदतीनं कडुलिंबाचे तेल लावाल्यास. या तेलामुळे जखमेतील सूक्ष्म जीवजंतूंचा खात्मा होवुन त्वचा विकार बरा करतो.

केसांच्या वृध्दी होते

केसांच्या वाढीसह केस घनदाट आणि मजबूत करण्यासाठी कडुनिंबाचे तेल वापरले जाऊ शकते. यामध्ये लिनोलिक, ओलिक आणि स्टीअरिक असिडसह विविध प्रकारचे फॅटी असिड सुद्धा असतात, जे टाळू आणि केसांचे पोषण प्रदान करतात. त्याचं बरोबर केसातील कोंडा (Dandruff) आणि ऊवा या सारख्या समस्या सोडवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचे उपयोग केला

मधुमेह आणि कफवर रामबाण उपाय

मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी अनेक तज्ज्ञ कडुनिंबाचा रस रोज घेण्याचा सल्ला देतात. वसंत ऋतूत ऊन जसं वाढायला लागतं तसा कफाचा त्रास होण्याचं प्रमाण वाढतं. थंडीच्या काळात पौष्टिक पदार्थ खाल्ल्यानं शरीरात कफ साठतो, पण बाहेरच्या गार वातवरणामुळे तो शरीराबाहेर न पडता शरीरात साठून राहातो. पण बाहेरचं वातावरण जसं गरम होतं त्या उष्णतेमुळे कफ पातळ होवून बाहेर पडायला लागतो. त्यामुळे या काळात थोड्या प्रमाणात थोड्या कालावधीसाठी कडुनिंब खाणं फायदेशीर ठरतं, म्हणून गुढी पाडव्याच्या निमित्तानं कडुनिंबाचं एक औषधी पेय पिण्याला महत्व आहे.

कडुनिंबाचं औषधी पेय

कडुनिंबाचं औषधी पेय तयार करण्यासाठी कडुनिंबाची अगदी कोवळी पानं, कडुनिंबाची नाजुकशी फुलं त्यात थोडी कैरी, चिंच, थोडी चिंच, ओवा, जिरे, मीठ, थोडी सूंठ पावडर आणि थोडा गूळ घालून वाटून घ्यावं. हे मिश्रण थोड्या पाण्यात एकत्र करुन चांगलं हलवून घ्यावं. नैवेद्याच्या छोट्या वाटीभर हे पेयं पिण्याला महत्व आहे. हे पेयं केवळ गुढी पाडव्याच्या दिवशी प्रतिकात्मक स्वरुपात प्यालं जात असलं तरी ते केवळ एकच दिवस पिणं उपयोगाचं नाही आणि ते कायम पिणंही फायदेशीर नाही. गुढी पाडव्यापासून पुढे किमान 5-6 दिवस हे पेयं पिणं गरजेच्ं असतं.

तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

कडुनिंबाचा रस औषधी आहे असं जरी असलं तरी तो सर्वांना चालतोच असं नाही. कडुनिंबाचा रस खूप जास्त आणि खूप काळ घेतला गेला तर शरीरात रुक्षपणा/ कोरडेपणा निर्माण होतो. त्यामुळे तो सर्वांनाच चालतो असा नाही, अनेकांसाठी तो पित्त वाढवणारा ठरतो त्यामुळे कडुनिंबाचं सेवन करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं उचित ठरतं.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या