Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
    कृषी

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 25, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चिमूर आणि वरोरा तालुक्यातील शेतमालाची, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज (दि.24) बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल होते.

    चिमूर तालुक्यातील भिसी येथे प्रकाश खाटीक व विलास खाटीक यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी, वाहनगाव येथील बालाजी जुगनाके, बोथली येथील नितीन खापणे, खामगाव येथील शालू रामटेके तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील प्रफुल्ल सोनकर, भेंडाळा येथील संजय उरकुडे या शेतकऱ्यांच्या शेतात जावून बाधित शेतमालाची पाहणी केली.

    पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, आज या परिसरात नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी करताना जाणवले की, अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ शासनास पाठवला जाईल. पिडीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान कसे मिळवून देता येईल, यासाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, विदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे दाणे अतिशय छोटे असून काही भागात कटाईला सुद्धा परवडणार नाही, अशी सोयाबीनची परिस्थिती आहे. गत महिन्याच्या भरपाईचा निर्णय शासनस्तरावर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून नुकसानीचा सर्व अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

    चिमूर तालुक्यात पाहणी दरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. संतोष थीटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर राजमाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते. तर वरोरा तालुक्यातील गावांच्या पाहणी दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

    चिमूर आणि वरोरा तालुक्यातील नुकसान : अतिवृष्टीमुळे चिमूर तालुक्यात बाधित क्षेत्र 3017.53 हेक्टर असून बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या 3418 आहे. तर वरोरा तालुक्यात एकूण बाधित क्षेत्र 592.25 हेक्टर आणि शेतकरी संख्या 1408 आहे.

    Agriculture Chandrapur Damage Guardian Minister Heavy rains
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif