Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची संवेदनशीलता
    जळगाव

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची संवेदनशीलता

    चिमुकल्याच्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाशाचा दीपक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments166 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सर्वसामान्यांच्या अडचणींना धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेले राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.

    आव्हाणे गावातील सय्यद मुस्तफा सय्यद कलीम या मुलाच्या दोन्ही डोळ्यांच्या उपचारासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने महागड्या उपचारांचा खर्च करणे परिवारासाठी शक्य नव्हते. मुलाच्या भविष्याची चिंता कुटुंबीयांना सतावत होती. ही बाब गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. मुलाच्या दोन्ही डोळ्यांच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च स्वतः उचलत त्याला नव्या आयुष्याची आशा दिली. त्यांच्या या मदतीमुळे उपचार यशस्वी झाले असून आता मुलाच्या दोन्ही डोळ्यांना दृष्टी प्राप्त झाली आहे.

    दृष्टी मिळाल्यानंतर आनंदित झालेल्या सय्यद मुस्तफा सय्यद कलीम याने आपल्या परिवारासह पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब आणि भाऊसो प्रतापराव पाटील साहेब यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हे या मदतीचे खरे फलित ठरले. यावेळी जीपीएस मित्रपरिवाराचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गरजू व्यक्तींना मदत, आरोग्यविषयक सहकार्य आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गुलाबराव पाटील साहेब सातत्याने जनतेशी जोडलेले राहतात. त्यांच्या या संवेदनशील कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एका गरजू कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif