चाळीसगाव : तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रारूप प्रभाग रचना ही सर्व नियम धाब्यावर बसवून केली आहे. रेल्वे, हायवे, नद्या हे क्राईट एरियाचा विचार न करता याचे सर्रासपणे उल्लंघन करून गट व गण प्रारुप रचना केली आहे. पूर्वीच्या गण रचनेमुळे सर्व समाजाला न्याय मिळत होता, मात्र आताच्या गट-गण रचनेमुळे विशेष करून अल्पसंख्यांक समाज उमेदवारांवर अन्याय होणार आहे असा गंभीर आरोप चाळीसगाव येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केला. या रचने विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून हरकत घेतली जाणार असून उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल 10 हजार मतदार कसे वाढले? असा सवाल देखील पदाधिकाऱ्यांनी केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव शशीकांत साळुंखे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले, अनुसूचित जमाती सेल जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे उपस्थित होते.
या पदाधिकार्ऱ्यांंनी आरोप केले की, तालुक्यात सामाजिक तोडफोड करून गट गण रचना केली आहे. या रचनांध्ये गट आणि गण मधील गावात मोठ्या प्रमाणात विसंगती आहे, रेल्वे, हायवे, नद्या याचे नियमांचा विचार न करता याचे सर्रासपणे उल्लंघन करून रचना केली आहे. गणामधील गावे हे एकमेकांपासून दूर असून यात खुप विसंगती आहे ज्या गणांना गावे जोडली आहेत त्या गावांचा कुठेही संबंध येत नाही. या रचनेमुळे मतदारांमध्ये संभ्रम होईल पण उमेदवारांना देखील त्याचा त्रास होणार आहे.
या प्रारूप रचना बाबत चाळीसगाव विभागाचे प्रांताधिकरी यांना विचारणा केली असता, प्रांताधिकारी म्हणतात याबाबत मला काहीच माहिती नाही? मग ही यादी कोणाच्या कार्यालयातून आली? राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना अडचण निर्माण होईल या पद्धतीने गट आणि गण रचना करण्यात आली आहे. तळेगाव व कृष्णनगर हे गांव पूर्वी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये होते ते गावे देखील एकमेकांपासून वेगळे केले आहे.
या प्रारूप रचना बाबत हरकती घ्याव्यात असे आवाहन आम्ही नागरिकांना करीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post