Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदील
    जळगाव जिल्हा

    धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदील

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 7, 2026No Comments57 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    धरणगाव शहराच्या दीर्घकालीन स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाला अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत राज्य शासनाने वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर धरणगाव नगरपरिषदेच्या प्रस्तावित सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जळगावचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

    राज्याच्या नगर विकास विभागाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सविस्तर कार्यपद्धती जाहीर केली आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये मलजल प्रक्रिया केंद्रे, मलजल वाहिनी जाळे, तसेच आडवणे आणि वळवणे प्रकल्पांच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंतची स्पष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल, तांत्रिक मान्यता, गुणवत्ता नियंत्रण, संचालन आणि देखभाल यासाठीही निश्चित निकष ठरविण्यात आले आहेत.

    धरणगाव नगरपरिषदेने सादर केलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, नाशिक यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. या प्रकल्पामध्ये ६ एमएलडी क्षमतेचे अत्याधुनिक एमएमबीआर तंत्रज्ञानाधारित मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासोबत आडवणे आणि वळवणे  या घटकांचाही समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे १२.४९ कोटी रुपये इतकी आहे.

    शासनाच्या नव्या धोरणानुसार प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदी, नाले किंवा इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासाठी आधुनिक एसटीपी उभारणे, मलजल वाहिनी जाळे विकसित करणे, नाले अडवून सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणे तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी बेसलाईन सर्वेक्षण, मृदा चाचणी, हायड्रॉलिक डिझाइन, बीओक्यू, विद्युत व यांत्रिक नियोजन, संचालन व देखभाल आराखडा आणि पुनर्वापराची योजना तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धरणगाव शहरातील उघड्या नाल्यांमधून वाहणारे दूषित सांडपाणी, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि जलप्रदूषणात मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्याने, वृक्षसंवर्धन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, बांधकामे आणि इतर नागरी उपयोगांसाठी करता येणार असल्याने नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif