किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

किंनगाव तालुका यावल मध्ये एका विवाहित महिलेला आणि तिच्या मुलाला विहिरीत ढकलून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या आजीला अटक केली आहे. तिला बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्या वृद्ध महिलेला जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, मृत मुलाचे वडील दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने, तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर पोलिसांनी त्यांना सोडून दिले आहे.सोमवारी, किंनगावमधील दंभुर्णी रोडवरील स्वप्निल भगवत पाटील यांच्या शेतातील एका विहिरीत, दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या विवाहित महिलेचा पती स्वप्निल याने सरस्वती पाटील (वय २७) आणि कृष्णा पाटील (वय साडेतीन वर्षे) या दोघांना दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विवाहितेचे पती स्वप्निल पाटील व सासू आशाबाई भागवत पाटील यांनी विहिरीत ढकलून दिले होते यात मुलाचा मृत्यू झाला.


