उत्कृष्ट कार्य, विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या शेंदुर्णी नगर पंचायतीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी.. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जळगाव जिल्ह्यातील सर्व विभागाना कार्यालयीन दैनंदिन कामकाजात सुसूत्रता आणणे, नागरिकांच्या सर्व प्रकारच्या सेवा पुरविण्यात तत्परता, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविणे, या सर्व बाबींच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयाने केलेल्या कामांचे मूल्यांकन करून त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे सन्मान गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन यांचे हस्ते जिल्हा नियोजन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या नगरपरिषद यांच्या वर्षभरात केलेल्या सर्व साधारण कामकाज या क्षेत्रात नगरपंचायत शेंदुर्णी चा तृतीय क्रमांक पटकवला. मा. गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा यांचे हस्ते मुख्याधिकारी विवेक धांडे व टीम चा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील सर्व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या सन्मान सोहळ्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील आ.किशोर पाटील जळगाव चे आ. सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.