टीकेनंतर राज्यपालांची प्रतिक्रिया…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून राज्यभरातील जनतेसह अनेक नेत्यांच्या तीव्र अश्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे संजय राऊतांनी बंडखोरांवर निष्ण साधला तर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या उठलेल्या तीव्र वादळानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी एका निवेदनातून आपली भूमिका मांडत आपे मत स्पष्ट केले आहे. ते म्हणाले कि, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. शुक्रवारी (२९ जुलै) राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.

मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असं स्पष्टीकरण भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे. असे राज्यपाल कोश्यारी यांनी यात नमूद केले.

नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये.” असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.