मुंबई | एकनाथ शिंदे हे प्रामाणिक नेते आहेत. आनंद दिघे यांचे ते शिष्य आहेत. गद्दारी त्यांचा रक्तात नाही. ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत. सरकारला यामुळे कोणताही धोका नाही. कारण महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार सिल्वर ओकवर आहेत, असं वक्तव्य अपक्ष नेते देवेंद्र भुयार यांनी केलं आहे.
राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी आम्ही मतदान केलं नसल्याचा आरोप केला. या विधानपरिषदेत आता त्यांच्याच पक्षातील तीन नेत्यांनी मतदान केलं नाहीये. आता संजय राऊत काय निर्णय घेतील हे मला बघायचं आहे. अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर मला आनंद होईल, असंही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय नाट्याला सुरवात झालीये. एकनाथ शिंदेंसह 25 आमदार नाॅटरिचेबल असल्याने शिवसेनेत खंडार पडणार असल्याची शक्याता वर्तवली जात आहे. गुजरातचे काही नेते एकनाथ शिंदे यांना भेटल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
यागळ्या घडामोडीत आता एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार सुरतला रवाना झाले आहेत. या सगळ्या संबधी पत्रकार परिषदेत घेऊन एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करतील.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.