Sunday, May 29, 2022

ग. स. सोसायटी निवडणूक.. मुदती अखेर ५४ जणांनी घेतली माघार

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटी म्हणजेच ग.स.सोसायटी निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज जिल्ह्यातील ग.स. सोसायटीच्या निवडणुकीच्या माघारी मुदती अखेर ५४ जणांनी माघार घेतली आहे. तर उर्वरित ११६
उमेदवार रींगणात उतरले आहेत.

- Advertisement -

जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटीची सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २५ मार्च ते ३१ मार्च मुदती अखेर २७८ इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यात १७० उमेदवारी अर्ज वैध होते. यातील वैध अर्जांपैकी १३ एप्रिल पर्यंत १४ तर १८ रोजी अर्ज माघारीच्या मुदती अखेर एकूण ५४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

माघारीनंतर २८ एप्रिल रोजी मतदान तर ३० एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजीच्या माघारीनंतर निवडणूक रिंगणात ११६ उमेदवार असून यात माजी व विद्यमान संचालक, अध्यक्षांसह अन्य उमेदवारांचा यात समावेश आहे.

ग.स. सोसायटी निवडणुकीत स्थानिक, बाहेरील, अनु.जाती/जमाती, महिला राखीव, इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती, वि.मा.प्र या ६ गटातून महीला राखीव २८, इमाव १८, अनुसूचित जाती/ जमाती १२, स्थानिक ५४, बाहेरील १४१, भटक्या विमुक्त २५ असे २७८ इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.

यात छाननीनंतर १७० अर्ज वैध होते. यातून ५४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात स्थानिक २७, बाहेरील ५६, अनु.जाती/जमाती ६, महिला राखीव १२, इतर मागासवर्ग ६, भटक्या जाती ९ या ६ गटातून ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातून २१ संचालक उमेदवार निवडून देण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सहकार, लोकसहकार, लोकमान्य, प्रगती, स्वराज्य पॅनल असे पाच पॅनल रिंगणात उतरले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या