शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांवर गोळीबार

धावत्या कारवर फायरिंग : अमरावतीमधील धक्कादायक प्रकार

0

अमरावती, लोकशाही न्युज नेटवर्क

विधानसभा निवडणूक जशी जशी समोर येत आहे तसतसे मोठ्या प्रमाणात राज्यात घडामोडी होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावतीमधून उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्यापूर येथील मूळ रहिवासी असलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष गोपाल अरबट अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी धावत्या कारवर म्हणजे त्यांच्या इनोव्हा गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सुदैवाने कोणाचेही नुकसान किंवा जिवितहानी झालेली नाही. तरी अचानक करण्यात आलेल्या या गोळीबारामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडीवर तीन राउंड फायर करण्यात आले, वलगाव पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार केली असून, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. राजकीय क्षेत्रातील तज्ञांच्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. त्याच लढाईतून ही घटना झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.