Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»आनंदवार्ता… गिरणा धरणही भरले तुडूंब
    जळगाव जिल्हा

    आनंदवार्ता… गिरणा धरणही भरले तुडूंब

    सिंचन अन्‌‍‍ पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली : 99.22 टक्के पाणीसाठा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 5, 2026No Comments130 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यात वाघूर धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला असून त्यापाठोपाठ गिरणा पट्ट्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले गिरणा धरण ही जवळपास फुल्ल झाले आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जलसंपदाच्या आकडेवारी नुसार सध्या गिरणा धरणात 99.22 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी 65.73 टक्के पाणीसाठा होता. गिरणा धरणात पाणीसाठा वाढल्याने धरणातून 22 हजार 284 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे दरवाजे 90 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरण भरल्याने 170 हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता दूर झाली आहे. तसेच सध्या गिरणा धरण प्रकल्पात एकूण 608.45 (द.ल.घ.मी) इतका पाणीसाठा आहे. त्यात मृत पाणीसाठा 84.90 (द.ल.घ.मी) इतका असून प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 523.55 (द.ल.घ.मी) इतका आहे. आजचा पाणीसाठा हा 604.35 (द.ल.घ.मी) असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 519.45 (द.ल.घ.मी) इतका आहे. गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, मालेगाव, नाशिकच्या काही गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून जळगावचा सिंचनाची चिंता दूर झाली आहे.

    दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोमवारी धरणात 37.41 टक्के इतका पाणीसाठा होता, आज त्यात 3.96 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हतनूर धरण क्षेत्रात आणखी पावसाची गरज आहे. सध्या 41.37 टक्के पाणीसाठा आहे. एकूणच धरण क्षेत्रात येत्या काही दिवसात पाऊस झाला तर भुसावळकरांची पाण्याची चिंता मिटेल अन्यथा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाले असून जलसाठा 71.8 टक्के इतका झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif