राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने आज खुशखबर दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे.  वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळणार आहे.

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना याआधी त्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here