नवी दिल्ली: देशातील सर्व लोकांना करोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे.
संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली.