Sunday, November 27, 2022

गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात; 50 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

- Advertisement -

गोंदिया, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

गोंदियामधून  एक मोठी बातमी समोर येत आहे. गोंदिया येथे एका पॅसेंजर ट्रेनने मालगाडीला धडक दिली. या अपघातात पॅसेंजर ट्रेनचा एक (Passenger Train Derailed) डब्बा रुळावरून घसरला. या अपघातात 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान जखमी प्रवाशांची (Injured passengers) प्रकृती गंभीर नसल्याचं सांगण्यात येत आहे. रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी (Bhagat Ki Kothi) ट्रेनला गोंदिया शहराजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

समोरून जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रायपूरहून (Raipur) पॅसेंजर ट्रेन नागपूरला (Nagpur) जात होती.

या अपघातात ट्रेनच्या तीन डब्बे रुळावरून घसरले. सिग्नल बिघडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 53 लोक किरकोळ जखमी तर 13 जणांना थोडा मार लागला आहे. या अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या