Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»अवैध दारू अड्ड्यावर गोळीबार; दोन कामगार गंभीर जखमी
    उत्तर महाराष्ट्र

    अवैध दारू अड्ड्यावर गोळीबार; दोन कामगार गंभीर जखमी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 3, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अवैध दारू अड्ड्यावर गोळीबार; दोन कामगार गंभीर जखमी

    जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात अवैध दारू विक्रेत्याने कंपनीतील दोन कामगारांवर गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी, दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास १०.१५ वाजता घडली. या घटनेत राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहमद फिरोज शेख (वय २६) हे गंभीर जखमी झाले असून, दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील ‘विजेता इंडस्ट्रीज’ या कंपनीतील कामगार सरफु शेख हा नाईट ड्युटीसाठी कंपनीत जात असताना रस्त्यातील एका टपरीवर थांबला. त्या ठिकाणी अवैध दारू विक्री करणारा एक व्यक्ती एखाद्याला मारहाण करीत होता. सरफुने हा प्रकार पाहिल्याचे लक्षात येताच, त्या दारू विक्रेत्याने त्यालाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सरफु शेखने आपल्या सहकाऱ्यांना  राजन आणि अहमद शेख यांना घेऊन स्पष्टीकरणासाठी बाहेर येताच, दारू विक्रेत्याने त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली.

    तेव्हाच तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने त्या आरोपीकडे गावठी पिस्तुल दिले, त्याने सलग चार ते पाच फायर करत तिघांवर गोळीबार केला. या गोळीबारात राजन आणि अहमद हे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

    घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Gun fire jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif