Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात सोन्या-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक
    जळगाव

    जळगावात सोन्या-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 19, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावात सोन्या-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक

    सर्वसामान्यांसाठी मोठा फटका ; पहा काय आहेत दर ….

    जळगाव: लग्नसराईच्या हंगामातच सोने आणि चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. जळगावच्या प्रसिद्ध सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून, चांदीच्या किमतींनीही विक्रमी पातळी गाठली आहे.

    २४ कॅरेट सोन्याचा दर (विना जीएसटी) ८८,८०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला, तर जीएसटीसह हा दर ९१,४६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
    चांदीच्या दरातही मोठी वाढ होत १,०२,५०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकावर चांदी पोहोचली आहे.
    केवळ गेल्या १८ दिवसांत सोन्याचा दर तब्बल ३३०० रुपयांनी, तर चांदीचा दर ६०००-६५०० रुपयांनी वाढला आहे.

    मध्य पूर्वेतील तणाव व जागतिक अस्थिरता – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढता तणाव आणि अमेरिका-चीन व्यापार धोरणांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचे दरही वाढले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीत अधिक गुंतवणूक केली जात आहे.

    सर्वसामान्यांसाठी मोठा फटका
    सोने आणि चांदीच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी लग्नसराईत दागिने खरेदी करणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली असून, अनेक ग्राहकांनी खरेदीला ब्रेक लावल्याचे सराफा व्यावसायिक सांगत आहेत. येत्या काळातही दर वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांसाठी मात्र हा चांगला काळ मानला जात आहे.

    Gold- Silver Rate jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif