लोकशाही न्यूज नेटवर्क
बजेट मध्ये सोने-चांदीवरील करात कोणतीही कपात झाली नाही. कर कपातीमुळे गेल्यावर्षी भाव कमी झाले होते. यंदा कराबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने मौल्यवान धातु स्वस्त होण्याची शक्यता मावळली होती. गेल्या दोन दिवसात सोन्याने मोठी मजल मारली. तर दुसरीकडे चांदीने नरमाईनंतर पु्न्हा झेप घेतली. काही शहरात तर सोने 800-1000 रुपयांनी वधारले. तर दुसरीकडे चांदी किलोमागे हजारांनी वधारली.
गेल्या आठवड्याप्रमाणेच सोन्याने या आठवड्यात कमाल दाखवली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर मंगळवारी 115 रुपयांनी आणि बुधवारी 1040 रुपयांनी सोने वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 84,657, 23 कॅरेट 84,318, 22 कॅरेट सोने 77,546 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,493 रुपये, 14 कॅरेट सोने 49,524 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,425 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.