टॉफी आणि कॅप्सूलमध्ये लपवून सोनं आणत होते; मात्र घडले असे काहीतरी…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दिल्ली विमानतळ आणि चेन्नई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तस्करीसाठी नेले जाणारे सोने जप्त केले आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना दिल्ली कस्टम्सने पकडले आहे. त्यांनी एका प्रकरणात 18 टॉफी पकडल्या असून त्यात एकूण 355 ग्रॅम सोने भरले होते. त्याचवेळी, दुसऱ्या प्रकरणात कॅप्सूलच्या आकाराच्या पाऊचमध्ये लपवून आणले जाणारे सोने दोन प्रवाशांकडून जप्त करण्यात आले आहे. दोघांकडून सुमारे एक किलो सोने जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

तिसरे प्रकरण चेन्नई विमानतळाचे आहे. येथील सीमाशुल्क विभागाने मस्कतहून परतणाऱ्या दोन प्रवाशांकडून सुटकेटमध्ये पोकळी बनवून आणलेले तीन किलो सोने जप्त केले आहे. बाजारात त्याची किंमत 1 कोटी 33 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही प्रवाशांना चेन्नई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

कस्टम सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्कतहून फ्लाइट क्रमांक AI 974 मधील एक प्रवासी IGI च्या टर्मिनल 3 वर आला होता. संशयाच्या आधारे सीमाशुल्क विभागाने त्याला चौकशीसाठी थांबवले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 18 टॉफी सापडल्या. ते उघडून पाहिले असता आतमध्ये टॉफीऐवजी सोने ठेवले होते. कस्टम विभागाने ते जप्त करून आरोपीला पकडले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे वजन 355 ग्रॅम असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसऱ्या प्रकरणात, बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला कस्टम्सने IGI विमानतळाच्या टर्मिनल 3 वर तपासणीसाठी थांबवले. तपासादरम्यान त्याच्याकडून दोन कॅप्सूलसदृश गोळ्या जप्त करण्यात आल्या. ते उघडून पाहिले असता त्यात सोने लपवून ठेवले होते. हे सोने 652 ग्रॅम वजनाचे निघाले. ते जप्त करण्यात आले असून प्रवाशाकडे चौकशी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.