सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर (Gold Rate) कमालीचा दबाव दिसून येत आहे.

मंदीच्या चाहुलमुळे सोन्याचे भाव वायदे बाजारातही (MCX) घसरले आहेत. केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवर आयात शुल्कात (Import Duty) वाढ केली आहे.  आता 7.5 टक्क्यांऐवजी 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर इंडेक्स (Dollar Index) तेजीत आहे. या सर्व घडामोडीचा सोन्यावर मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गेल्या 11 महिन्यातील सर्वात निचांकी स्तरावर (Lowest Level) आहेत. पण भारतीय सराफा बाजारावर म्हणावा तसा परिणाम अद्यापही दिसून आलेला नाही. कालच्या तुलनेत आज सोने-चांदीचे दर किंचित घसरले आहेत. गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,200 रुपये होती. तर चांदी (Silver Rate) 56,600 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये  (Mumbai) 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,400 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,200 रुपये आहे. पुण्यात (Pune) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे. नागपूर  (Nagpur) मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे. नाशिकमध्ये (Nashik) 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे. 999 शुद्ध चांदी या आठवड्यात 54,767 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली, गेल्या आठवड्यात हाच भाव 56,427 रुपये प्रति किलो होता. या आठवड्यात चांदीच्या किंमतीत 1660 रुपये घसरण नोंदवण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.