मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

परदेशी बाजारातील कमजोर कलांमुळे मंगळवारी सोन्या-चांदीत घसरण झाली. मकरसंक्रातीच्या निमित्ताने सोन्याला चांगलीच चकाकी आलेली दिसते तर वर्षाच्या पहिल्याच सणाच्या निमित्ताने सोने बाजारांत हाहाकार माजवत असल्याचे दिसत आहे. अर्थसंकल्प 2025 चा 1 फेब्रुवारी 2025 ला जाहीर होणार असून त्याचाही सोनं आणि चांदीच्या आयातकरावर परिणाम होऊ शकतो.
पिवळ्या धातूचा भाव 80 रुपयांनी घसरून 80,580 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यासह पाच दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या दरातील वाढीचा कल संपुष्टात आला. सोमवारी सोन्याचा भाव 80,660 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,950 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 73,290 रुपये इतका आहे. मंगळवारी चांदीचा भावही 1300 रुपयांनी घसरून 91,700 रुपये प्रति किलोवर आला. मागील सत्रात चांदी 93,000 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 80 रुपयांनी घसरून 80,180 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, जो पूर्वी 80,260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदर कमी करू शकते. याचे कारण रोजगाराची भक्कम आकडेवारी आहे. यामुळे अमेरिकन रोखे उत्पन्न आणि अमेरिकन डॉलरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 10 वर्षांच्या यूएस बॉण्ड्सवरील उत्पन्न सोमवारी 14 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले. तथापि, आशियाई बाजारात चांदीचा भाव 30.32 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिला.

