जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सणासुदीच्या दिवसात सोने आणि चांदीचे भाव प्रचंड वाढले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून धातूच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. लग्नसराईचा काळ येणार असून आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरल्याने लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुसखबर आहे.
जळगाव येथील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा सोन्याचा दर 74,970 रुपये आहे म्हणजेच आज सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. तसेच आजचा चांदीचा दर 88,760 रुपये आहे म्हणजेच चांदीच्या दरात 540 रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे.