जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात लोक आवडीने दागिने खरेदी करतात असे असताना सोने चांदीचा दर गगनाना भिडताना दिसत आहेत. दरम्यान, आज दि. 23 रोजी पुन्हा एकदा सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाली आहे. चांदीचा दर थेट एक लाखाच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या भावाने देखील 81 हजार रुपयांचा आकडा पार केला आहे.
चांदी झाली लाखमोलाची
सोने आणि चांदीचा दर आपल्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. ताज्या माहितीनुसार चांदीचा भाव 1 हजार पाचशे रुपयांच्या वाढीसह थेट एक लाख रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात ही सलग पाचवी दरवाढ आहे.
सोन्याचा भाव एैंशी हजार
सोन्याच्या भावातही सध्या वाढ झाली आहे. 99.5 फीसदी शुद्रतेचे सोने 350 रुपयांनी वाढून 80,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. सराफा बाजारात सोन्याचा भाव तेजीसह 81,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
ही आहेत भाव वाढीची कारणे
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे या काळात भारतभरात दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळेही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.