सोने चांदीच्या दरात मोठा बदल, पहा आजचा भाव

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्की काय वाचा. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी झटका दिला. भावात मोठी वाढ झाली. मंगळवारी सोन्यात घसरण झाली होती. गेल्या आठवड्यात एक दिवसाच्या गॅपनंतर सोने 600 रुपयांनी तर चांदी 4 हजारांनी उसळली होती.

सोने 500 रुपयांनी वधारले

गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. मंगळवारी सोन्याच्या दरात 120 रुपयांनी घसरण झाली. तर 21 ऑगस्ट रोजी बुधवारी सोने 550 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीत 1 हजारांची वाढ

गेल्या आठवड्यात चांदीने 4,000 रुपयांची झेप घेतली होती. तर या आठवड्यात सुरुवातीला चांदीत सुस्तावली होती. मंगळवारी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. तर आज किंमतीत कोणताच बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

जळगाव येथील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजचे सोन्याचे भाव 71,860 रुपये आहे तर चांदीचा भाव 85,300 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,945, 23 कॅरेट 71,657, 22 कॅरेट सोने 65,902 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,959 रुपये, 14 कॅरेट सोने 42,088 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 85,321 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.