Wednesday, August 17, 2022

सोने-चांदीचे दर वधारले; जळगाव, नाशिक, औरंगाबादचे दर तपासा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेन (Russia-Ukraine Crisis) यांच्यात तणाव कायम असून युद्ध सुरूच आहे. यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold – Silver Price) वाढ पाहायला मिळत आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी सोन्याचा वायदे भाव 1.5 टक्क्यांनी वाढला. या वाढीसह सोन्याचा दर 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोने दरात तब्बल 800 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्यासह चांदीचा वायदे भावही वाढला आहे. चांदीच्या दरात 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह दर 65,869 किलोग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे.

जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोने दरात वाढ होत असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. या महिन्यात सोनं 6 टक्क्यांनी महागलं – मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव फेब्रुवारीमध्ये 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. हे दर मागील एका वर्षाच्या सर्वोच्च स्तरावर आहेत. रशिया आणि युक्रेनमधील संकट वाढतचं राहिलं, तर सोन्या-चांदीच्या किमती वाढतच जातील असं जाणकारांचं म्हणणं आहे.

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सोनं 55 हजारपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज आहे. शुक्रवारी सोने दरात काहीशी घसरण झाली होती. MCX वर शुक्रवारी सोन्याचा वायदे भाव 1.05 टक्के अर्थात 553 रुपयांनी कमी झाला होता. यामुळे सोने दर 51000 रुपयांजवळ होता. चांदीचा वायदे भावही 1105 रुपयांनी कमी होऊन 65,793 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत होता. परंतु आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे.

जळगावातील भाव
सोने- 52019
चांदी- 67514

नाशिकमधील भाव
सोने- 52399
चांदी- 67819

औरंगाबादमधील भाव
सोने- 51950
चांदी- 67420

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या