सोन्याचे दर 53 हजाराच्या पार, चांदीही तेजीत; तपासा जळगाव, नाशिक, औरंगाबादचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) सुरूच आहे. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवहारावरसह भारतीय बाजारपेठेवरही उमटताना दिसतायत. याच युद्धाचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या किंमतीतही सातत्याने अस्थिरता निर्माण झाली आहे.

आज (4 मार्च) रोजी सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या (Gold) दरात 490 रुपयांनी तर चांदीच्या (Silver) दरात 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. यानुसार, सोन्याचा दर 53,000 हजार प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा दर आज 68,600 प्रति किलोवर पोहोचला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका

सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ सुरूच आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात सोने 55 हजारांचा दर ओलांडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सध्या सोने 53 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे पोहोचले आहे.

सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. रशिया युक्रेनमधील युद्ध सुरु होताच आर्थिक व्यवस्थादेखील ढासळू लागली आहे. सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47 हजारांवर होता. एका आठवड्यात सोन्याचा दर आज 53 हजारांच्या पुढे गेला आहे.

जळगावमधील दर
सोने  53075
चांदी  70115

नाशिकमधील दर
सोने 53299
चांदी  70258

औरंगाबादमधील दर
सोने 53352
चांदी 70210

 

Leave A Reply

Your email address will not be published.