दिलासादायक.. सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेन यांच्यातील तणावानंतर (Russia Ukraine War) सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पहायला मिळाला. काल सोने आणि चांदीचे दर पन्नास हजाराच्या पुढे गेले होते तर आज सोन्या-चांदीत (Gold Silver Price Today) जोरदार घसरण झाली असून सकाळपासून सोने सुमारे 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेले काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने उसळी दिसून येत होती. मात्र, आज हा दर काहीसा दिलासादायक आहे. रशिया-युक्रेन तणावामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट दिसून येत आहे.

आजचे सोन्याचे दर

आज सोनं काहीसं स्वस्त मिळतंय. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे दर कमी झालेले दिसून येत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे एप्रिलचे फ्युचर्स मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. सध्या एमसीएक्सवर सोन्याचे दर 1.13 टक्क्यांनी घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 583 रुपयांनी खाली आले असून ते सध्या 50,960 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. अशाप्रकारे आज सोने 51,000 पर्यंत खाली आले आहे.

चांदीच्या दरात देखील किंचित घसरण

सोन्याच्या किंमतीत घसरण होत असतानाच चांदीचे दरही स्वस्त झाले आहेत. आज चांदीची दर 1200 रुपयांनी कमी झाले असून गुंतवणूकदारांना चांदीत गुंतवणूक आणि खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीचे दर 1,217 रुपयांनी किंवा 1.84 टक्क्यांनी घसरले आहेत. चांदीच्या मार्च फ्युचर्सच्या किंमतीवर नजर टाकली तर चांदी 64,814 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.