जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्ही सोने-चांदी (Gold- Silver Price Today) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने स्वस्त झाले असून चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात सोने 293 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले, तर चांदी 509 रुपयांनी महाग झाली. सध्या सोन्याचा दर 3540 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 18151 रुपये प्रति किलोने स्वस्त होत आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने 52660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61829 रुपये प्रति किलोवर बंद झाली. दुसरीकडे, मागील व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार) रोजी सोने 52953 रुपये आणि चांदी 61320 रुपयांवर बंद झाली होती.
जळगावमधील दर
जळगाव (Jalgaon) येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजचे सोन्याचे दर 52700 रुपये आहे. तर चांदीचा दर 62000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर
शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 53, 52,660 रुपये झाला. 23 कॅरेट सोने 53 रुपयांनी स्वस्त होऊन 52,449 रुपये झाला. 22 कॅरेट सोने 48 रुपयांनी स्वस्त होऊन 48,237 रुपये झाला. 18 कॅरेट सोने 40 रुपयांनी स्वस्त होऊन 39,495 रुपये झाला. तर 14 कॅरेट सोने 31 रुपयांनी स्वस्त होऊन 30806 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.