सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

दोन दिवस सोने चांदीच्या दरात झाली होती. आता सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. म्हणून सोने चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. सोन्याच्या दरात 152 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर हा सरासरी 76460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर दुसऱ्या बाजुला चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 1389 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आज चांदीचे दर 90000 रुपयांवर गेले आहेत.

जळगाव येथील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे दर 76,740 रुपये आहे म्हणजेच आज सोन्याच्या दरात  200 रुपयांची वाढ झालीय. तर आज चांदीचा दर 91,610 रुपये आहे. म्हणजेच 1,120 रुपयांची वाढ झालीय.

दिल्लीच्या सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 77513 रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीचा दर हा 94000 रुपयांवर गेला आहे.

चेन्नईत देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईत 10 ग्रॅम सोन्यासाठी 77361 रुपये मोजावे लागत आहेत. तर चेन्नईत चांदीच्या दरानं लाखाचा टप्पा गाठला आहे. चेन्नईत चांदी 1 लाख 2 हजार रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबईत देखील सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत  10 ग्रॅम सोन्यासाठी 77367 रुपये मोजावे लागत आहेत. तर मुंबईत चांदीचे दर 93000 रुपयांवर पोहोचले आहेत.

कोलकातामध्ये  देखील सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. कोलकातामध्ये 10 ग्रॅम सोन्यासाठी 78025 रुपये मोजावे लागत आहेत. तर कोलकातामध्ये चांदीचे दर 94800 रुपयांवर पोहोचले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.