दिलासा : चांदीच्या भावात घसरण ; सोन्याच्या भावात वाढ !
जाणून घ्या आजचे भाव ….
जळगाव प्रतिनिधी एकीकडे सोन्या चांदीच्या दराने उच्चांक गाठले असतांना आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार २९ रोजी अचानक जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले असून सर्वसामान्य ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आज सोने प्रति १० ग्रामला १ लाख ४३ हजार १०० रुपये तर चांदी प्रतिकिलो २ लाख ४२ हज़ार झाली.दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या या आकडेवारीतून सोन्याच्या भावात रविवारच्या तुलनेत ३ हज़ार १०० रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो रविवारी २ लाख ५३ हजार भाव असतांना आज चांदी ११ हजारांनी उतरून प्रति किलो २ लाख ४२ हजार इतका भाव झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
दरम्यान रविवारी चांदीच्या दरात पुन्हा सहा हजार रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा दर थेट किलोमागे २ लाख ५३ हजार रुपयांवर पोहोचला . त्याचबरोबर सोन्याच्या दरातही ७०० रुपयांची वाढ झाली , १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४० हजार ४०० रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ११ दिवसांतच चांदीने दोन लाखांवरून अडीच लाखांचा टप्पा पार केल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आले .
१७ डिसेंबर रोजी चांदीचा दर २ लाख १ हजार ५०० रुपये होता. २० डिसेंबरला तो २ लाख ९ हजारांवर, २४ डिसेंबरला २ लाख २२ हजारांवर, २६ डिसेंबरला २ लाख ३२ हजार ५०० रुपयांवर, २७ डिसेंबरला २ लाख ४७ हजार रुपयांवर पोहोचला. अखेर २८ डिसेंबर रोजी चांदीने २ लाख ५३ हजार रुपयांचा नवा उच्चांक गाठला. मात्र सोमवारी २ लाख ४२ हजार अशी एकूण ११ हजार रुपयांनी चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली.