Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»खुशखबर.. सोन्याच्या दरात घसरण
    लोकार्थ

    खुशखबर.. सोन्याच्या दरात घसरण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 14, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तुम्ही जर सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर आज म्हणजे बुधवारी प्रति 10 ग्रॅमसाठी 96 हजार 593 रुपयांवर आला आहे.  तोळ्यामागे 20 दिवसात जवळपास साडेपाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. ही सोन्याच्या दरातील मोठी घसरण मानली जात आहे. भारत-पाक युद्ध थांबल्यामुळे आणि अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध टळल्यामुळे आंतरारष्ट्रीय बाजारात वेगाने घडामोडी सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण पाहायला मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

    जळगाव शहरातील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा सोन्याचा दर 93,520 रुपये म्हणजे  380.00 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचा दर 96,670 रुपये आहे म्हणजेच चांदीच्या दरात 40.00 रुपयांची घसरण झाली आहे.

    गेल्या काही आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेला सोन्याचा दर आता घसरणीच्या मार्गावर आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 96 हजार 593 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 22 एप्रिल   रोजी हा दर 1 लाख 2 हजार 73 रुपयांपर्यंत   होता. त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात जवळपास 5 हजार 480 रुपयांची घट झाली आहे.

    भारतात लग्नसराई सुरु असल्यामुळे अनेक ग्राहक ही घसरण खरेदीसाठी अनुकूल मानत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर यांसारख्या शहरांतील सराफा बाजारांमध्ये ग्राहकांची उपस्थिती वाढत आहे. अनेक सराफ विक्रेत्यांनी सांगितले की, मागील काही दिवसांतील मंदीतून आता बाजार सावरत असल्याचे संकेत मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सोनं दीर्घकालीन गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्यामुळे, सध्याचा दर ही खरेदीसाठी चांगली संधी ठरू शकते.

    Gold rate today
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेलबाबत पुन्हा मोठा निर्णय

    May 31, 2026

    इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा संघर्ष पेटला

    May 29, 2026

    पुढच्या महिन्यात पेट्रोल १५० तर डिझेल १७० रुपये लिटर?

    May 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif