मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. सोन्याच्या अस्थिर दरामुळे ग्राहकांमध्येदेखील सोनं खरेदी करण्याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता.
परंतु, आता सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट सुरुच आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.34 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचेे दर 51,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 47,640 वर व्यवहार करत आहेत. चांदीचा दर 0.82 टक्क्यांनी घसरून 556 रुपयांनी घसरून 66,850 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
जाणून घेवूया विविध शहरातील सोन्याचे भाव. मुंबईमध्ये 47640, पुणे 47690, नागपूर 47690, नाशिक 47680, दिल्ली 48585, कोलकाता 48495, चेन्नई 48500, औरंगाबाद 52843 , जळगाव 52814.