सोन्याच्या दराने पुन्हा घेतली उसळी ; जाणून घ्या आजचे दर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
मकर संक्रांतीपासून सोन्याचे दर चांगलेच वधारले असून आज २० रोजी १० ग्राम सोन्याला ५६ हजार ८६० रुपये इतका दर जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळाला . सोन्याच्या दरात ४१० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. . तसेच दुसरीकडे चांदीच्या दरात कालच्या तुलनेत वाढ झाली असून चांदी किलोप्रमाणे आज ६८ हजार ८८० भाव मिळाला. चांदीत कालच्या तुलनेत ६०० रुपयांची वाढ झाली.

एकीकडे सध्या लग्नसराईसराईचा मौसम सुरु असून त्यामुळे सोन्याला चांगली मागणी वाढली आहे . तर दुसरीकडे वायदे बाजारात सोने विक्रमीस्तरावर पोहचले आहे. तर चांदीच्या भावात चढ उतार सुरुच आहे. आर्थिक मंदीची भीती, कोरोनाचा कहर, डॉलर निर्देशांक, रशिया-युक्रेन युद्ध या सर्वांचा बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.