सोन्याच्या किमतीची वाढीकडे वाटचाल!

पुन्हा उलटफेर : ग्राहकांची धाकधूक वाढली

0

मुंबई : सोन्याच्या दरांमधील वाढ अलीकडच्या दिवसांत कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. गेल्या काही दिवसांआधी सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल दिसत होता पण पुन्हा एकदा मौल्यवान धातूंच्या दरांनी तेजीसह उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. वायदा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला तर सराफा बाजारात सोन्याची किंमत 100 रुपयांनी महागली आहे.
सोने आणि चांदीच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या किमतीत 130 रुपयांची वाढ झाली तर, चांदीच्या किमतीत 100 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,00,160 रुपये 10 ग्रॅम झाली आहे. त्याचवेळी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 91,810 रुपये, 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 75,120 रुपये झाली आहे.
आगामी सणोत्सवाच्या काळात सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांचा खिसा चांगलाच कापला जाणार आहे कारण ग्राहकांना फक्त सोन्याची किंमत नाही तर खरेदीवर टॅक्स आणि इतर शुल्कही भरावे लागणार आहेत. दुसरीकडे, वायदा बाजारात सोने-चांदीच्या दरांनी तेजीसह उसळी घेतली आहे. मंगळवार दि. 22 जुलै रोजी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचे दर कमी झाले, पण मागील सत्रात स्थिर अमेरिकन डॉलरमध्ये 1टक्क्याहून अधिक वाढ नोंदवली गेली. आजाराच्या सुरुवातीला सोन्याचा वायदा किंमत कमी झाली पण अवघ्या एका तासांत 500 रुपयांपर्यंत वाढला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.