जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोने खरेदी करणाऱ्यासाठी खुशखबर आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळं ऐन लग्नसराईत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात 0.14 टक्क्यांची घसरण झाली आहे.
आज सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं 75,650 रुपयांवर पोहोचले आहे. काल सोन्याची किंमत 75,760 रुपये इतकी होती. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 100 रुपयांनी घसरून 69,350 रुपयांवर स्थिरावली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 56,740 रुपयांवर स्थिरावली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि जागतिक घडामोडी यांचा परिणामही सोन्याच्या किंमतीवर होत आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात घसरण होत आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची निवडणूकीचे पडसादही जागतिक बाजारपेठेत उमटले होते.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 69,350 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 75,650 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 56,740 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,935 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 565 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 674 रुपये