सोने- चांदीच्या दरात वाढ, तपासा आजचे नवीन भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. सोन्याने आज पुन्हा एकदा 51 हजारांचा टप्पा पार केला. त्याबरोबरच आज चांदीही वाढली असून ती 62 हजारांच्या वर ट्रेड करत आहे.

सोन्या बरोबरच आज चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. MCX वर सोमवारी सकाळी चांदीचा भाव 382 रुपयांनी वाढून 62,498 रुपये प्रति किलो झाला. आज चांदीचे फ्युचर्स लवकरच 0.61 टक्क्यांनी वाढून 62,500 रुपये प्रति किलोवर पोहोचले.

जळगाव येथील सराफ व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याचे दर 52500 रुपये तर चांदीचे दर 64500 वर पोहचले आहेत.

पुणे येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव  47,900 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,240 रुपये आहे. मुंबईमध्ये  22 कॅरेट सोन्याचा भाव  47,850 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा भाव  52,200 रुपये आहे. नागपूर येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव  47,900 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा भाव  52,240 रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.