Friday, May 20, 2022

सोन्याला झळाळी, चांदीही तेजीत ! जाणून घ्या जळगावातील आजचे दर

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

सध्या सोने आणि चांदी तेजीत आहे. काल आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून आली. तसेच आज देखील सोन्याचे दर वाढले असून चांदीमध्ये मोठी तेजी नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 409 रुपयांनी महागले आहे.

- Advertisement -

या तेजीसह आज सकाळी सोने 52588.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. आज चांदीच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 1011.0 रुपयांनी वाढला आहे. चांदी 68305.00 वर व्यवहार करत आहे.

सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,868 रुपये होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,310 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 44,425 रुपये होता. तर 18 कॅरेटचा भाव 39,983 रुपये आणि 16 कॅरेट सोन्याचा दर 35,540 रुपये झाला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 68760 रुपयांवर पोहोचला आहे.

आज जळगावात सोन्याचा दर 53250 रुपये आणि चांदी 69500 रुपये आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या